Amla Benefits | हिवाळ्यामध्ये करा आवळ्याचे सेवन; होतील ‘या’ समस्या दूर

Amla Benefits | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण थंडीमुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

अशात हिवाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकतात. आवळ्यामध्ये आढळणारे गुणधर्म या ऋतुमध्ये तुमच्या शरीराची काळजी घेण्यास मदत करतील. आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला ( Amla Benefits )  खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते ( Increases immunity- Amla Benefits )

आवळ्यामध्ये ( Amla Benefits )  भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

हिवाळ्यामध्ये नियमित आवळ्याचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी आजारांपासून दूर राहू शकतात. यासाठी तुम्ही आवळ्याचा रस, आवळ्याचा मुरब्बा इत्यादींचे सेवन करू शकतात.

हृदय निरोगी राहते ( The heart remains healthy- Amla Benefits )

आवळ्यामध्ये ( Amla Benefits )  अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे हृदयाची काळजी घेण्यास मदत करतात.

त्याचबरोबर नियमित आवळ्याचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी हृदय सुदृढ राहते.

केसांसाठी फायदेशीर ( Beneficial for hair- Amla Benefits )

आरोग्यासोबत आवळा ( Amla Benefits )  आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त मानला जातो. नियमित आवळ्याचे सेवन केल्याने केस काळे आणि दाट होतात.

यासाठी तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही आवळ्याच्या तेलाने केसांची मसाज करू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते ( Digestive system remains healthy-Amla Benefits )

आवळ्यामध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात आढळून येते, जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर आवळ्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

नियमित आवळ्याचे सेवन केल्याने तुम्ही गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्टता इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.

सर्दी-खोकल्यापासून आराम ( Relief from cold and cough-Amla Benefits )

बदलत्या वातावरणामध्ये अनेकांना सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही नियमित आवळ्याचे सेवन करू शकतात.

कारण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे या समस्यांना दूर करण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

टिपः वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्त्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.