Rohit Sharma | “मी तुम्हाला टी-20 वर्ल्ड कपसाठी पाहिजे असेल तर…”; रोहित शर्माने बीसीसीईला स्पष्टच सांगितलं

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 च्या उपांत्य फेरीमध्ये टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता.

तेव्हापासून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) टी-20 क्रिकेटपासून लांब आहे. अशात रोहित शर्मा ( Rohit Sharma )  टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

त्याचबरोबर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माला ( Rohit Sharma )  भारतीय संघाचा कर्णधार बनवणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माची  Rohit Sharma )  निवड समितीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या चर्चेत रोहित शर्माने बीसीसीईला त्याच्या कर्णधार पदाबद्दल स्पष्ट सांगितलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माची ( Rohit Sharma ) निवड समितीसोबत व्हिडिओ कॉलवर सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

यामध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) बीसीसीआयला म्हटलं आहे की, “तुम्हाला टी-20 विश्वचषकासाठी माझी निवड करायची असेल तर मला त्याबद्दल आत्ताच सांगा. त्याबद्दल कसे काय करायचे? ते देखील मला आत्ता सांगा.”

The T20 World Cup is just seven months away

दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी फक्त सात महिने राहिले आहे. यामुळे टीम इंडिया या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत आहे.

या स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) किंवा हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya ) सोपवल्या जाऊ शकतं, अशा चर्चा आहेत.

जर रोहित शर्माने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व करण्यास नकार दिला तर ही जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.