Maharashtra Assembly Winter Session | तू तू मी मी च्या पलीकडे जावून अधिवेशनात प्रश्न सोडवा

Maharashtra Assembly Winter Session | उद्या सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूर मध्ये महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्ष या दोघांनी पत्रकार परिषद घेतली. या सर्वच प्रस्थापित पक्षांनी तू तू मी मी करण्यामध्येच जास्त रस घेतलेला दिसतोय.

NCRB च्या आकडेवारी तुलनात्मक पद्धतीने पाहताना पुरोगामी, प्रगत, सुरक्षीत महाराष्ट्राचे काय झाले आहे याकडे पुर्ण दुर्लक्ष केले. जनतेने गुन्हेगारीचे, शेतकरी आत्महत्या चे चटके हे सहन करायचेच आहेत असे बहुदा सत्ताधाऱ्यांना वाटत असावे.

शिक्षक भरती वर प्रश्न विचारणाऱ्या मुलीला दम देणारे सरकार नुसतीच भरतीची खोटी आश्वासने देते आहे. दुध उत्पादकांचे कंबरडे मोडण्याचे काम शासन आणि काही प्रक्रिया उद्योग मिळून करीत आहेत. विमा कंपन्यांच्य अरेरावी पूढे सरकार झुकलेले दिसते आहे.

स्वस्तातील सरकारी शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था कोलमडत आहे. ईतर राज्यातील निवडणुकात स्वस्तात गॅस सिलिंडर चे आश्वासन ट्रीपल इंजिन सरकार महाराष्ट्रात राबवेल अशी जनता अपेक्षा करते आहे. आरक्षणाच्या नावाने तणाव निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरु आहे. त्यावर केंद्र आणि राज्य सरकार मिळून ठोस निर्णय या अधिवेशनात घेतले जातील अशी अपेक्षा आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.