ICC Rankings – अभिमानास्पद! आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर तर भारताचे ‘हे’ खेळाडू वैयक्तिक क्रमवारीत अव्वल

ICC Rankings | भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी भारताचे पाच खेळाडू वेगवेगळ्या वैयक्तिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. शुभमन गिल (वनडे, फलंदाज), रविचंद्रन अश्विन (टेस्ट, गोलंदाज), रवींद्र जडेजा (टेस्ट, ऑलराउंडर), सूर्यकुमार यादव (टी20 फलंदाज), रवी बिश्नोई (गोलंदाज) टी-२० मध्ये अव्वल स्थानावर आहे.

भारतीय संघाने या दशकात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नसली तरीही टीम इंडियाचे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्येही टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

पण वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया फायनल वगळता प्रत्येक सामन्यात चॅम्पियनप्रमाणे खेळली. भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचा परिणाम आयसीसी क्रमवारीतही दिसून येत आहे. आयसीसीच्या 12 वेगवेगळ्या क्रमवारीत भारतीय संघ आणि भारतीय खेळाडूंनी आठ क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

T20 ICC Rankings

टी20 मध्ये भारतीय संघ 16,137 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर दुसऱ्या स्थानावर इंग्लंड 11,133 गुणसह आहे. त्याचबरोबर भारताचा सूर्यकुमार यादव हा टी-२० मध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तर गोलंदाजांच्या क्रमवारीत रवी बिश्नोई पहिल्या स्थानावर आहे.

मराठमोळा पुण्याचा रुतुराज गायकवाडही फलंदाजांमध्ये सातव्या स्थानावर आहे. टी20 च्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या तिसऱ्या स्थानावर आहे.

ICC ODI Rankings

वनडेमध्ये भारतीय संघ ६,६४० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया ४,९२६ गुणसह आहे. वनडे ICC Ranking मध्ये शुभमन गिल फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या तर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे.

  • वनडे ICC Ranking गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज तिसऱ्या, जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर, कुलदीप यादव सहाव्या आणि मोहम्मद शमी दहाव्या स्थानावर आहे.
  • वनडे ICC Ranking अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा 10व्या स्थानावर आहे.

ICC TEST Rankings

कसोटीतही भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. भारताचे ३,४३४ गुण आहेत, तर ऑस्ट्रेलिया ३,५३४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे रेटिंग 118 आहे. ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा एक सामना जास्त खेळला आहे. यामुळे हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

  • ICC TEST Ranking मध्ये गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन अव्वल स्थानावर तर रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे.
  • अष्टपैलू ICC TEST Ranking मध्ये रवींद्र जडेजा पहिल्या तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. अक्षर पटेलही पाचव्या स्थानावर आहे.

 ICC Rankings मध्ये टॉप वर असलेले भारताचे खेळाडू 

  • सूर्यकुमार यादव- टी20 फलंदाज
  • रवि बिश्नोई- टी20, गोलंदाज
  • शुभमन गिल- वनडे, फलंदाज
  • रविचंद्रन अश्विन- टेस्ट, गोलंदाज
  • रवींद्र जडेजा- टेस्ट, ऑलराउंडर

भारताचे 18 खेळाडू आयसीसी क्रमवारीत अव्वल 10 मध्ये कायम आहेत. यातील पाच खेळाडू अव्वल स्थानावर आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.