Share

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा

Meteorological department has issued a red alert for rain in Pune today. The Meteorological Department has predicted the possibility of heavy rain (Pune Rain) at Ghat Matha in the district. Due to this, the Meteorological Department has warned citizens to be alert.

Published On: 

The Meteorological Department ( IMD Alert ) has warned of danger in 'these' districts including Pune

🕒 1 min read

Pune Rain Weather Update । मागच्या काही दिवसापासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पाऊसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. सध्या देखील हवामान विभागाने पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. पुण्यात हवामान विभागाने आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस (Rain Update) पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुण्याशिवाय इतर जिल्ह्यातही हवामान विभागाने पाऊसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातही आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय त्याचबरोबर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Pune Rain News)

मबुंई शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसामुळे नागरिकांचे हाल

महाराष्ट्रात अतिवृष्टीनंतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असून ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे अशा ठिकाणच्या नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावसामुळे अनेक भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे सर्वांना सतर्क करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही