IPL 2024 | आयपीएल 2024 मध्ये हार्दिकची जागा घेणार ‘हा’ अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2024 ची सर्व फ्रेंचाईजींनी तयारी सुरू केली आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे.

तत्पूर्वी आपल्याला ( IPL 2024 ) अनेक संघात मोठे बदल झालेले दिसले आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे.

हार्दिक मुंबईमध्ये सामील झाल्यानंतर गुजरातने शुभमन गिलकडे ( Shubman Gill ) संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. अशात गुजरातमध्ये हार्दिकची जागा कोण भरून काढेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर इरफान पठाण यांनी वक्तव्य केलं आहे.

इरफान पठाण म्हणाले, “गुजरात टायटन्सला हार्दिक पांड्याची उणीव भासणार आहे. संघामध्ये ( IPL 2024 ) त्याच्या जागी अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अजमतुल्ला ओमरझाई ( Azmatullah Omarzai ) घेऊ शकतो.

हा खेळाडू फिट आहे. त्याचबरोबर बॅट आणि बॉल दोन्हीने तो उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. त्याचबरोबर संघाकडे अफगाणिस्तान राशिद खान देखील आहे. तो देखील संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो.”

The IPL 2024 auction will be held in Dubai on 19 December 2024

दरम्यान, 19 डिसेंबर 2024 रोजी आयपीएलचा ( IPL 2024 ) लिलाव दुबईमध्ये होणार आहे. आयपीएल  2024 ( IPL 2024 ) च्या लिलावासाठी 1166 खेळाडूंच्या नावांची नोंदणी झाली आहे.

यामध्ये 212 कॅप्ड, 909 अनकॅप्ड आणि 45 सहयोगी देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. तर या यादीमध्ये 830 भारतीय खेळाडू ( IPL 2024 )  सामील झाले आहेत.

830 पैकी 18 खेळाडू कॅप्ड आहे. यामध्ये मनीष पांडे, शिवम मावी, धवल कुलकर्णी केदार जाधव, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मनदिप सिंग, जयदेव उनाडकर, बरिंदर स्त्रान, शहाबाद नदीम, वरुण आरोन, संदीप वारियर, हनुमा विहारी, हर्षल पटेल, चेतन सकारिया, केस भरत, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, करुण नायर, या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या