Share

Ravi Bishnoi | कौतुकस्पद; टीम इंडियाचा रवी बिश्नोई ठरला जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाज

Ravi Bishnoi | टीम महाराष्ट्र देशा: आयसीसीने अव्वल स्थानी ( ICC Ranking ) असलेल्या खेळाडूंची नवी यादी घोषित केली आहे. आयसीसी टी-20 गोलंदाजी यादीमध्ये भारतीय संघातील युवा गोलंदाज रवी बिश्नोई ( Ravi Bishnoi ) याने अव्वल स्थान पटकावलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये याने ( Ravi Bishnoi ) उत्कृष्ट गोलंदाजी करत पाच सामन्यांमध्ये तब्बल नऊ विकेट घेतल्या होत्या. यानंतर आयसीसी टी-20 गोलंदाजी यादीमध्ये तो ( Ravi Bishnoi ) प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे.

Rashid Khan is second in the list with 692 points

भारतीय संघातील युवा गोलंदाज रवी बिश्नोई ( Ravi Bishnoi ) 699 गुणांचं आयसीसी टी-20 गोलंदाजी यादीमध्ये अव्वल स्थानी जाऊन पोहोचला आहे.

त्याने ( Ravi Bishnoi ) अफगाणिस्तानचा स्फोटक गोलंदाज राशिद खानला मागे टाकत हे स्थान मिळवलं आहे.

राशिद खान 692 गुणांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा आदिल राशिद आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा हे दोघे आहेत.

दरम्यान, गोलंदाजीसह फलंदाजी यादीमध्ये देखील भारतीय संघ प्रथम क्रमांकावर आहे. टीम इंडियातील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) फलंदाजीच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

तर टीम इंडियातील ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या

Ravi Bishnoi has reached the top position in the ICC T20 bowling list with 699 points | Who is No 1 bowler in t20? | What is the career of Ravi Bishnoi in IPL? | Which Academy did Ravi Bishnoi play?

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now