Virat Kohli | टी-20 विश्वचषकासाठी विराट कोहली BCCI ची पहिली पसंती नाही? लवकरच होणार बैठक

Virat Kohli | टीम महाराष्ट्र देशा: नुकतीच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 संपली आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघातील स्फोटक फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli ) याने सर्वाधिक धावा केल्या आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर जून 2024 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये विराट कोहली ( Virat Kohli ) बीसीसीआयची पहिली पसंती नसल्याच्या चर्चा सुरू आहे.

विराट कोहली ( Virat Kohli ) ऐवजी इशान किशन ( Ishan Kishan ) क्रमांक 3 वर खेळू शकतो, अशा चर्चा सुरू आहे. त्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी विराट कोहली आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार असल्याचं बोललं जात आहे.

Virat Kohli will play this T20 World Cup

येणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माने ( Rohit Sharma ) करावं, अशी इच्छा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Virat Kohli ) टी-20 क्रिकेटपासून दूर आहे.

यानंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करावं,  अशी बीसीसीआयने इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे विराट कोहली ( Virat Kohli ) देखील हा टी-20 विश्वचषक खेळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

मात्र, बीसीसीआय त्याच्या जागी नंबर 3 ला इशान किशनला संधी देणार असल्याचं बोललं जात आहे. अशात विराट कोहली ( Virat Kohli ) ऐवजी इशान किशन बीसीसीआयची पहिली पसंत ठरणार का? याकडे आता सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागला आहे.

दरम्यान, विराट कोहली ( Virat Kohli ) हा टी-20 क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 50 पेक्षा अधिक सरासरीने 1000 पेक्षा अधिक धावा केलेल्या आहे. अशात बीसीसीआय त्याच्या जागी इशान किशनला संघात संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.