Nawab Malik | ज्या भाजप विरोधात मलिकांनी रान उठवले आज त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले

Nawab Malik | नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक ( Nawab Malik ) जेलमध्ये असताना अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केली.

त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना  ( Nawab Malik ) जामीन देण्यात आला.

परंतु, यानंतर देखील नवाब मलिक  ( Nawab Malik ) यांनी कोणत्या गटाला पाठिंबा दर्शवला आहे? हे स्पष्ट केलेलं नाही.

अशात नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नवाब मलिक  ( Nawab Malik )  सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेले दिसून आले आहे.

या घटनेनंतर नवाब मलिकांनी  ( Nawab Malik ) अजित पवार गटाला पाठिंबा दिला असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर सामान्य नागरिकांनी नवाब मलिक यांना धारेवर धरलं आहे.

ज्या भाजप विरोधात मलिकांनी रान उठवले आज ते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आहे, अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे.

Nawab Malik has supported which group?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक  ( Nawab Malik ) यांनी कोणत्या गटाला पाठिंबा दिला आहे? याबाबत अद्याप स्पष्टता नव्हती.

अशात नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक  ( Nawab Malik ) सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आहे. यानंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला असल्याचं बोललं जात आहे.

तर त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देत शरद पवार यांना डच्चू दिला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या सर्व प्रकरणावर शरद पवार ( Sharad Pawar ) काय प्रतिक्रिया देतील? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादींवर चर्चा होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काल झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.

पण, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधक जी मागणी करतील त्या सर्व विषयावर चर्चा करायला राज्य सरकार तयार आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमताने ठराव झालेला असून समितीचं त्यावर काम आणि अभ्यास सुरू आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे तयार करायला सांगितले आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.