Rohit Sharma | रोहित शर्मा टी-20 सामने खेळणे थांबवणार? पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला…

Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 मध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या कर्णधार पदावर प्रश्न उपस्थित झाला होता. टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्मा भारताकडून एकही टी-20 सामना खेळणार नाही. त्याला टी-20 संघात स्थान मिळणार नाही, असा दावा अनेक मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. अशा परिस्थितीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन आपल्या टी-20 कारकीर्दीबद्दल माहिती दिली आहे.

कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले, “खेळाडूंना सतत सामने खेळणे शक्य नाही. खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेण्याची देखील गरज असते. माझ्या बाबतीत तेच झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन टी -20 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे टी-20 आंतरराष्ट्रीय सामने सोडण्याचा सध्या माझा कोणताही विचार नाही.”

श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्माचा समावेश करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर या मालिकेमध्ये विराट कोहली, के एल राहुल हे खेळाडू देखील नव्हते. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय संघामध्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हे खेळाडू पुढे टी-20 मालिकेमध्ये खेळतील की नाही, हे सांगणे कठीण आहे.

रोहित शर्माने भारतीय संघासाठी 30.82 च्या सरासरीने 148 सामने खेळत टी-20 सामने खेळत 3853 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 29 अर्धशतके आणि चार शतके लगावली आहेत. रोहित शर्मा टी-20 फॉर्मेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button