Share

Goa Guide | गोव्याला जाण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या

Goa Guide | टीम महाराष्ट्र देशा: जानेवारी-फेब्रुवारीमधील वातावरण अतिशय अल्हाददायक असते. या वातावरणामध्ये लोक फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. कारण हे वातावरण फिरायला जाण्यासाठी अनुकूल मानले जाते. या ऋतूमध्ये अनेक लोक गोव्याला भेट देण्याचा विचार करत असतात. तुम्ही पण जर  या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये गोव्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या … Read more

Published On: 

Goa Guide | टीम महाराष्ट्र देशा: जानेवारी-फेब्रुवारीमधील वातावरण अतिशय अल्हाददायक असते. या वातावरणामध्ये लोक फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. कारण हे वातावरण फिरायला जाण्यासाठी अनुकूल मानले जाते. या ऋतूमध्ये अनेक लोक गोव्याला भेट देण्याचा विचार करत असतात. तुम्ही पण जर  या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये गोव्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गोव्याबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये गोव्यात कमी बजेटमध्ये हॉटेल्स उपलब्ध असतात. त्यामुळे या ऋतूमध्ये तुम्ही गोव्याला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमची ट्रिप एकदम कमी बजेटमध्ये होऊ शकते. त्याचबरोबर या महिन्यात समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वातावरण असते. त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये गोव्याला फिरायला जाण्याचा प्लान करू शकतात.

गोव्यामध्ये तुम्ही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स देखील आनंद घेऊ शकतात. फेब्रुवारी महिना हा पॅराग्लाइडिंग करण्यासाठी योग्य महिना मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही गोव्याला जाऊन पॅराग्लायडिंग आणि हॉट बलून रायडींगचा आनंद घेऊ शकतात.

गोव्यामध्ये होणारा जगप्रसिद्ध कार्यक्रम कार्निव्हल देखील फेब्रुवारी महिन्यात आयोजित केला जातो. हा कार्यक्रम दरवर्षी 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान होतो. या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी जगभरातले पर्यटक येतात. त्यामुळे तुम्ही पण जर गोवा ट्रिप प्लॅन करत असाल, तर या दिवसांमध्ये तुमची गोवा ट्रिप उत्तम होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही