Job Recruitment | ‘या’ बँकेत नोकरीची संधी, 06 फेब्रुवारीपर्यंत करता येईल अर्ज

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने (NHB) भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीय गृह निर्माण बँकेतील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी पदानुसार इच्छुक उमेदवार nhb.org.in या … Read more

Published On: 

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने (NHB) भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीय गृह निर्माण बँकेतील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी पदानुसार इच्छुक उमेदवार nhb.org.in या अधिकृत वेबसाईटला जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 06  फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये 36 पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदांच्या जागा आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 06 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. पदानुसार इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी nhb.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेमध्ये वय वर्ष 23 ते वय वर्ष 55 दरम्यान असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय गृह बँकेतील भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तर, SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 48,170 ते 1,29,000 रुपये प्रतिमहा वेतन मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही