Share

Anil Deshmukh | अनिल देशमुख घेणार शिंदे-फडणीसांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

🕒 1 min read Anil Deshmukh | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ते मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. दरम्यान, उच्च न्यायालायाने त्यांना जामीन देताना मुंबईबाहेर न जाण्याची अट घातली आहे. असं असताना देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच … Read more

Published On: 

🕒 1 min read

Anil Deshmukh | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ते मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. दरम्यान, उच्च न्यायालायाने त्यांना जामीन देताना मुंबईबाहेर न जाण्याची अट घातली आहे.

असं असताना देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यांनी आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालायाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते .

ते म्हणाले, “सध्या उच्च न्यायालयाने मला मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली असल्याने या महिन्याच्या शेवटी कोर्टाची परवानगी घेऊन मी नागपूरमध्ये जाणार आहे. त्यावेळी मी विदर्भ तसेच माझ्या मतदारसंघाचा दौरा करणार आहे. कोर्टाची परवानगी घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदर्भात पक्षाचे काम करेन.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विकासकामांसदर्भात पत्र लिहिले होते. हे पत्र नागपूर, विदर्भातील समस्यांबाबत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विकासकामांना कशी गती देता येईल यासाठी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या