Arvind Sawant | लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून अरविंद सावंत म्हणाले, “माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे…”

Arvind Sawant | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असून विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. मोदी मुंबईत येणार असल्याने भाजप-शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देताना त्यावर नाव न टाकल्याने अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी संताप व्यक्त केला आहे

ते म्हणाले, “काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मला निमंत्रण द्यायला आले होते. यापत्रिकेवर मी सोडून मुंबईच्या पाच खासदारांच नाव आहे. यामध्ये दोन मिंधे गटाचे आणि तीन भाजपाचे आहेत. तसेच या पत्रिकेच्या पाकिटावरही माझं नाव नाही.”

“काही दिवसांपूर्वीही मला एक निमंत्रण पत्रिका आली होती, त्यावर केवळ अरविंद सावंत असे लिहिले होते. माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधं खासदारही लिहीलं नव्हत. त्यामुळे हा कार्यक्रम कोणाचा आहे आणि कशासाठी आहे? हे अतिशय स्पष्टपणे जनतेपुढे आलं आहे”, असा टोला अरविंद सावंत यांनी भाजपला लगावला आहे.

हा कार्यक्रम फक्त मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रसिद्धी करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, “आज फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येत आहे. ‘खोटं बोला पण रेटून बोला’ यामध्ये माहीर असेलल्या भाजपाचा हा उपक्रम आहे.”

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.