Eknath Shinde | “मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं, आज तेच…”; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde | मुंबई : मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर देखील टीका केली आहे.

“मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी मागची २५ वर्षे केलं आज तेच नाकं मुरडत आहेत, आरोप करत आहेत”, अशी टीका किरण पावसकर यांनी केली आहे. “मुंबईकरांचा खड्ड्यात घालण्याचं काम कुणी केलं? मुंबईकरांचा विश्वासघात इतकी वर्षे कुणी केला?”, असे सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे.

कोरोना काळातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे त्याची पोलखोल होण्यास सुरूवात झाली आहे. हा सगळा भ्रष्टाचार लवकरच माध्यमांसमोर येणार आहे, असंही किरण पावसकर यावेळी बोलताना म्हणालेत. पुढे ते म्हणाले, “मुंबईकरांच्या विकासाठी त्यांना पुढची किमान २५ वर्षे खड्डे मुक्त रस्त्यांवरून जाता यावं यासाठी आम्ही काम करत आहोत.

“आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्याचा ठसा जगभरात उमटवला आहे. मुंबईतल्या कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पणासाठी जर ते येत असतील तर श्रेयवादाची लढाई कशाला करता?, असा सवाल पावसकर यांनी केला. ज्यांना टीका करायची आहे त्यांना कुठे टीका करायची ते देखील कळत नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला.

महत्वाच्या बातम्या :