Shah Rukh Khan | बिकिनीच्या वादावर शाहरुख म्हणाला, “बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिकासारखं कोणी..”

Shah Rukh Khan | मुंबई: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ (Pathaan) 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्यावर वादविवाद सुरू आहे. ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यानंतर चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी देखील होत होती. अशा परिस्थितीत शाहरुख खानने ‘बेशर्म रंग’ गाण्याबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यामध्ये दीपिका पादुकोनने परिधान केलेल्या भगव्या बिकिनी वरून मोठा वाद निर्माण झाला होता. तिच्या भगव्या बिकिनीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. आतापर्यंत या वादावर चित्रपटातील कोणत्याही कलाकाराने प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी चित्रपटातील मुख्य अभिनेता शाहरुख खान याने आपलं मत मांडलं आहे.

‘पठाण’ चित्रपटाची निर्मिती केलेल्या ‘यशराज फिल्म’ शाहरुख खानच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मुलाखतीमध्ये त्याला दीपिकाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “दीपिका पदुकोन एक उत्तम अभिनेत्री आहे. ॲक्शन सीन करताना तिने मला सुद्धा टक्कर दिली आहे. या चित्रपटामध्ये एकीकडे ती बेशरम रंगामध्ये बोल्ड डान्स करत आहे. तर दुसरीकडे चित्रपटात ती एका मुलाला उचलून मारताना दिसत आहे. हे कॉम्बिनेशन फक्त दीपिका सारखी अभिनेत्रीच करू शकते.”

यशराज फिल्म निर्मित ‘पठाण’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिका साकारणार आहे. शाहरुख खानचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या