Supriya Sule | “मला त्यांची काळजी वाटते, ते ग्रामपंचायत निवडणूक असली तरी…”; सुप्रिया सुळेंचा मोदींना खोचक टोला

Supriya Sule | पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज मुंबईत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली आहे.

“नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना पळायला लागते. ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावे लागते. भाजपकडे मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही”, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

“शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. ते हयात असतानाच त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी नेमले होते. उद्धव ठाकरे हे त्यांचे उत्तराधिकारी आहेत. स्वत: बाळासाहेबांनी नियुक्त केलेले आहेत. उद्धव ठाकरे अनेक वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अध्यक्ष आहेत”, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.