Nana Patole | “एखाद्या गटाराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करावं, हे…”; नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

Nana Patole | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदी मुंबईत येणार असल्याने भाजप-शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, उदघाटनाच्या या कार्यक्रमावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपव्रर सडकून टीका केली आहे.

पंतप्रधान उद्घाटन करत असेल्या कामांमध्ये काही गटारांची कामंही आहेत. देशाच्या पंतप्रधांनी गटारांचं उद्घाटन करणं म्हणजे पंतप्रधान पदाला एकप्रकारे धक्का लावण्याचं काम भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलाय.

ते म्हणाले, “नरेंद्र मोदी हे गेली आठ-नऊ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांनी भाजपाचा प्रचार केल्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. मुळात पंतप्रधानांनी महापालिकेच्या प्रचाराला यावं की ग्रामपंचायतील यावं, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही. पण गटाराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करावं, हे मात्र पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं आहे.”

पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याचं भूमीपूजन केलं होतं, त्याचं काय झालं?, असा खोचक सवाल नाना पटोलेंनी केला आहे. राज्यपाल असेल किंवा भाजपाचे नेत सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.