🕒 1 min read
IPL 2024 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2024 साठी सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये आयपीएलचा ( IPL 2024 ) लिलाव होणार आहे.
क्रिकेट प्रेमी आयपीएलची आतुरतेने वाट बघत आहेत. आयपीएल संपल्यानंतर क्रिकेट चाहते लगेचच टी-20 विश्वचषक स्पर्धेचा आनंद लुटणार आहेत.
अशात खेळाडू देखील यंदाच्या आयपीएलकडे ( IPL 2024 ) एक संधी म्हणून बघणार आहे. आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून हे खेळाडू टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
T20 World Cup will be played immediately after IPL 2024
आयपीएल 2024 ( IPL 2024 ) नंतर लगेच टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू जोरदार तयारी करत आहे.
त्याचबरोबर आयपीएलमध्ये ( IPL 2024 ) उत्कृष्ट कामगिरी आणि आपले कौशल्य प्रदर्शित करत काही खेळाडू टी-20 संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
यामध्ये संजू सॅमसन ( Sanju Samson ), वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar ), जितेश शर्मा ( Jitesh Sharma ), अर्षदीप सिंग ( Arshdeep Singh ) इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, एकेकाळी टी-20 मध्ये टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज असलेला युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) काही दिवसांपूर्वी आपलं स्थान गमावून बसला आहे.
त्याचा पदभार रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi ) स्वीकारला आहे. त्यानंतर ऑगस्टपासून चहल टी-20 क्रिकेटपासून दूर आहे.
अशात आयपीएल ( IPL 2024 ) हंगामामध्ये चांगली कामगिरी करून चहल आपलं भारतीय संघातील स्थान परत मिळवणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.
या खेळाडूंसह टी-20 क्रिकेटपासून लांब असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील ही स्पर्धा खेळणार असल्याचं बोललं जात आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व अशी इच्छा बीसीसीआयने व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Travel Tips | निसर्ग सौंदर्याचा जवळून अनुभव घ्यायचा आहे? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Virat Kohli | टी-20 विश्वचषकासाठी विराट कोहली BCCI ची पहिली पसंती नाही? लवकरच होणार बैठक
- Mustard Oil | हिवाळ्यामध्ये अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे मोहरीचे तेल; जाणून घ्या सविस्तर
- Nawab Malik | ज्या भाजप विरोधात मलिकांनी रान उठवले आज त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले
- Ajit Pawar | हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होणार का? अजित पवार म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











