IPL 2025 । आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात झाली होती. त्यावेळी सलामीच्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध चेन्नई आमनेसामने होते. पण यंदा कोणते दोन संघ सलामीचे सामने खेळणार आहे? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (IPL 2025 Opener)
पण यंदा आयपीएल सुरू होण्यापूर्वी तारखेभोवती काही अनिश्चितता निर्माण झाली आहे. पूर्वीच्या अहवालात 14 मार्चपासून सुरू होण्याचे संकेत दिले गेले होते. दरम्यान, गतवर्षी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात अंतिम सामना पार पडला होता.
त्यामुळे IPL 2025 च्या सुरुवातीचा सामना KKR आणि SRH यांच्यात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर या तपशीलांची पुष्टी होईल. तसेच आगामी हंगामात आयपीएल (IPL) सामन्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
First Match in IPL 2025 SRH VS KKR
गेल्या वर्षी KKR ने विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे आता यंदाच्या वर्षी कोणता संघ विजेतेपद जिंकेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. इतकेच नाही तर यंदा मैदानात नवीन चेहरे देखील खेळताना दिसणार आहे. या चेहऱ्यांचा संघाला कितपत फायदा होतो? हे लवकरच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या :