Ajit Pawar । दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्याचा अर्थसंकल्प (Budget Session) सादर होणार आहे. आपल्याला या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहे.
कारण या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojna) महत्त्वाची घोषणा केली जाणार आहे. अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 03 मार्चपासून सुरु होणार आहे तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी सादर केला जाणार आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान माहिती दिली आहे. आगामी अर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नवीन योजना आणणार? की दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Budget Session 2025
तसेच विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजेनच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, अर्थसंकल्पामध्ये या योजनेचा हप्ता जाहीर केला जाईल, अशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी दिली होती. त्यामुळे महिलांचे या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :