Pankaja Munde । मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण बदलले आहे. तसेच संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी देखील ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. इतकेच नाही तर वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या समर्थनासाठी देखील आंदोलने केली जात आहेत.
पण याच प्रकरणाबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांना काहीही माहिती नाही. “जिल्ह्यात काय सुरू आहे ते मला काही माहिती नाही. कारण मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त आहे. माझ्यासाठी काम महत्त्वाचे आहे,” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी काल दिली. यावरून खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
“पंकजा मुंडे पाच वर्ष कामापासून बाजूला होत्या. त्यामुळे त्यांना बीड जिल्ह्यात काय सुरु आहे याची माहिती नाही. त्यांच्याकडून अशी उत्तरे अपेक्षित नाहीत. लहान मुलाला पण समजतं की कुठे काय सुरु आहे,” अशी टीका बजरंग सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
Bajrang Sonawane vs Pankaja Munde
दरम्यान, सोनावणे यांनी वाल्मिक कराडवर देखील निशाणा साधला. “वाल्मिक कराडकडे सापडलेल्या मोबाईलबाबत मी काही बोलत नाही. सगळ्यांना बेड्या ठोकल्या. पण पोलिसांनी या वाल्मिक कराडला बेड्या का घातल्या नाहीत? असा प्रश्न मी पोलिसांना विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :