Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येवरून विरोधी पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्तेदेखील एकवटले आहेत. सातत्याने ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील याप्रकरणी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे.
अशातच आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “14 FIR असलेल्या व्यक्तीला, दोन शासकीय अंगरक्षक मिळवून देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे. (आपल्या कष्टाच्या कराच्या पैशातून एका गुन्हेगाराचे संरक्षण ?) 15 तारखेला SP ना सांगून अंगरक्षक recall करवून, वाल्मिक कराड ला पळून जाण्याची संधी उपलब्ध अरुण देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे. खून, जीवे मारण्याची धमकी, खंडणी असे 50 च्या वर सेक्शन्स असलेल्या माणसाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे परळीचे अध्यक्ष करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे.”
“वाल्मिक कराडला पदोपदी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे. संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी या दोन वेगवेगळ्या केस बनवण्यासाठी राजकीय दबाव आणणारे मंत्री धनंजय मुंडे. तपास न होऊ देणे, कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांची SIT बनवणे, सगळं सगळं करुन चुकणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे. ह्या धनंजय मुंडेंचा जो पर्यंत राजीनामा होणार नाही, तो पर्यंत लढत राहिला हवं,” असे दमानिया म्हणाल्या आहेत.
अंजली दमानिया यांच्याशिवाय विरोधकांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे आता धनंजय मुंडे राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Anjali Damania on Dhananjay Munde
त्याशिवाय काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. यावर धनंजय मुंडे यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, धनंजय मुंडे आणि खंडणीखोर वाल्मिक कराड यांचे चांगले संबंध आहेत. याप्रकरणी धनंजय मुंडेंचेही नाव खराब झाले आहे. त्यामुळे नैतिकतेचा विचार करून मुंडे पदाचा राजीनामा देणार का? अशा चर्चा जनतेमध्ये सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :