Share

Saif Ali Khan । रात्रभर घरातच पाळत ठेवून होता हल्लेखोर, धक्कादायक माहिती आली समोर

Shocking information has come to light that the attackers were holed up in Saif Ali Khan house all night. At around 2 am, Saif Khan heard an argument between the assailant and the female domestic worker.

by MHD

Published On: 

Saif Ali Khan Stabbed

Saif Ali Khan । बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर आज पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास राहत्या घरात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला (Saif Ali Khan Attacked) केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्याच्या मानेवर आणि पाठीवर मोठ्या जखमा झाल्या असून त्याच्यावर एकूण सहा वार केले आहेत.

अशातच आता या हल्लेखोराबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हल्लेखोर रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्री 2 च्या सुमारास सैफ खानला हल्लेखोराचा ⁠आणि घरातील महिला कर्मचाऱ्याचा वाद सूरु असल्याचा आवाज आला. तेव्हा त्याची आणि हल्लेखोराची बाचाबाची झाली.

याच हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच या तिघांचे फोनदेखील जप्त केले आहेत. सध्या सैफची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Saif Ali Khan Stabbed

दरम्यान, इतकी तगडी सुरक्षा असताना सैफवर हल्ला कसा झाला? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला आहे. पोलिसांना महिला कर्मचाऱ्यावर संशय आहे. याप्रकरणी पोलीस महिला कर्मचाऱ्यादेखील जबाब नोंदवणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही