🕒 1 min read
Saif Ali Khan । लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. त्याने अनेक अवॉर्ड्सही जिंकले आहेत. बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत त्याने काम केले आहे. अशातच आता सैफ अली खानबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
सैफच्या राहत्या घरात चोरांनी जीवघेणा हल्ला (Saif Ali Khan Attacked) केल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. जीवघेण्या हल्ल्यामध्ये त्याच्या मानेवर आणि पाठीवर मोठ्या जखमा झाल्या असून त्याच्यावर एकूण सहा वार केले आहेत. (Saif Ali Khan Stabbed)
चोरी करायच्या उद्देशाने हा चोर शिरला होता. पण अचानक सैफला जाग आली. त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मग चोराने सैफवर हल्ला केला. चोराने सैफच्या पाठीमध्ये खुपसलेलं हत्यार बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. इतकेच नाही तर त्याच्या मानेवरही १० सेंटीमीटरचा घाव आहे.
Saif Ali Khan Hospitalised
सध्या सैफची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान,हा हल्ला नेमका का झाला? कशासाठी झाला? याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत. पण इतकी तगडी सुरक्षा असताना सैफवर हल्ला कसा झाला? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला सांगा”; Suresh Dhas यांचा पुन्हा हल्ला
- Walmik Karad ने हत्येच्या दिवशी दिली संतोष देशमुखांना धमकी! एसआयटीने सादर केला मोठा पुरावा
- Walmik Karad ला मोठा दणका! कोर्टाने ‘इतक्या’ दिवसांपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now






