Shatrughan Sinha । बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना सध्या नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. याला कारण आहे म्हणजे प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांचा फोटो. एका फोटोवरून शत्रुघ्न सिन्हा सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
16 जानेवारी रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान थोडक्यात बचावला. त्याला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी अनेक कलाकारांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
“आमचा निकटवर्तीय, लाडका आणि सर्वांना आवडणाऱ्या सैफ अली खानवर झालेला हल्ला फारच दुर्देवी आहे. तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून देवाचे आभार मानतो की तो सुरक्षित आहे. कायमच माझे आवडते राहिलेले ‘शो मन’ राज कपूर यांची नात करिना खान आणि त्यांच्या कुटुंबाला यामधून सावरण्यासाठी शुभेच्छा,” अशा आशयाचे कॅप्शन देऊन शत्रुघ्न सिन्हा यांनी एक फोटो शेअर केला होता.
Shatrughan Sinha trolling in social media
पण शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केलेला फोटो एआय जनरेट केलेला होता. या फोटोमध्ये सैफच्या उजव्या हाताला साइन लावली असून तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला आहे. करिना त्याच्या बाजूला असून दोघेही कॅमेराकडून पाहून स्मितहास्य करत आहेत, असा तो फोटो होता. हाच फोटो नेटकऱ्यांना आवडला नाही आणि त्यांनी शत्रुघ्न सिन्हा ट्रोल केले. त्या फोटोवर “लाज वाटली पाहिजे. तुम्ही अशा गंभीर प्रसंगी तुम्ही असा फोटो शेअर करताय,” अशा कमेंट्स त्यांच्या फॉलोअर्सनी दिल्या आहेत. फोटोवरुन त्यांच्यावर टीका केल्याने त्यांनी हा फोटो सोशल मीडियावरून काढून टाकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :