Ladki Bahin Yojana । राज्य सरकारने विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यापूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. सध्या या योजनेच्या लाभार्थी महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
परंतु आता काही महिलांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण नुकतेच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत मोठे विधान केले आहे. “ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, त्यांचे पैसे चलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत येतील,” असा दावा आदिती तटकरे यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेचे अर्ज पडताळणीचे काम सुरू असून यात आम्हाला बोगस अर्जाबाबत माहिती मिळेल त्यानुसार आम्ही त्या महिलांवर कारवाई करणार आहे. सुरवातीला जो शासन निर्णय जाहीर केला त्यानुसारच याची अंमलबजावणी केली जाणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
परंतु काहीच दिवसांपूर्वी त्यांनी निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला यापुढच्या काळात आपोआप वगळण्यात येतील. विरोधक विनाकारण पैसे परत घेणार असल्याच्या अफवा उडवत असून दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेणार नाही, असे वक्तव्य तटकरे यांनी केले होते. परंतु, सरकारने आता लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याचा निर्णय घेत त्यांना मोठा धक्का दिला आहे.
Aditi Tatkare statement on Ladki Bahin Yojana
त्यामुळे आता नेमके कोणाकोणाचे पैसे माघारी घेतले जाणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पडताळणीच्या भीतीने सुमारे 4 हजार महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तसेच हप्ता जमा केलेल्या बहिणींवर सरकारी भावाचं प्रेम अचानक कमी कसं झालं, असा प्रश्न पुन्हा एकदा विरोधकांकडून विचारला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :