Share

मल्टिटॅलेंटेड Sushant Singh Rajput..! 99% लोकांना जमणार नाही असे दोन्ही हातांनी करायचा कठीण काम

Sushant Singh Rajput was eager to learn many things besides acting. He stood seventh in the country in the Delhi College of Engineering entrance exam in 2003.

by MHD

Published On: 

Sushant Singh Rajput difficult task to do with both hands

Sushant Singh Rajput । जरी आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्यात नसला तरी त्याच्याबद्दल अनेक गोष्टी अजूनही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अजूनही त्याचे सोशल मीडिया (Social media) वर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज त्याचा जन्मदिवस (Sushant Singh Rajput Birth Anniversary) असल्याने त्याच्याबद्दल अनेक रंजक किस्से समोर येत आहे.

सुशांत सिंग राजपूतला अभिनयासोबतच अनेक गोष्टी शिकण्याची उत्सुकता होती. त्याने 2003 मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग प्रवेश परीक्षेत देशात सातवा क्रमांक पटकावला होता. इतकेच नाही तर तो भौतिकशास्त्रात राष्ट्रीय ऑलिंपियाड विजेता होता.

विशेष म्हणजे त्याला दोन्ही हाताने लिहिता येत होते. सध्या त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो त्याच्या दोन्ही हातांनी लिहिताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावरून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Sushant Singh Rajput Birthday

दरम्यान, एकता कपूरने 2008 साली त्याला ‘किस देश मै मेरा दिल’ या शोमध्ये त्याला कास्ट केलं आणि त्यानंतर तो ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘काई पो छे’ मधून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान मिळवले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही