Pankaja Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या केल्याने बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना अजूनही एका फरार आरोपीला पकडण्यात यश आले नाही. मंत्री पंकजा मुंडे यांनी देशमुख यांच्या कुटंबीयांची भेट घेतली नसल्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.
अखेर आता पंकजा मुंडे यांनी देशमुख यांच्या कुटंबीयांची भेट न घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. “संतोष देशमुख यांच्या कुटंबीयांनी मला विनंती केली होती की, ताई तुम्ही येऊ नका. कारण इथली परिस्थिती आमच्या हातात नाही. देशमुख कुटुंबीयांची परवानी घेऊन मी तेथे जाईल हे मी आधीच स्पष्ट केले आहे. पण माझ्या जाण्यापेक्षा आधी तेथे न्याय जाणे गरजेचा आहे,” असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “मी तेथे जाणे आणि संतोष देशमुख यांच्या मृत्यूविषयी संवेदना बाळगणे हा माझा सर्वस्वी वैयक्तिक विषय आहे. त्याचे जगासमोर प्रकटीकरण करण्याची गरज नाही. माझ्या ईश्वराला, मला, जनतेला आणि देशमुख परिवाराला हे माहिती आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
Pankaja Munde on Santosh Deshmukh case
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री पदावरून आपले मत स्पष्ट केले आहे. “मी बीडची कन्या आहे. मला बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता. त्याशिवाय बीडकरांना देखील खूप आनंद झाला असता. कोणत्याही संविधानिक पदावर नसताना मागची पाच वर्ष पूर्णवेळ संघटनेसाठी काम केले आहे,” असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :