Beed News । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाने मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. दररोज या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहे. आताही याच जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहेत. यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. परंतु, 2020 पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्यांनी ही कागदपत्रे सादर केली नाहीत.
त्यामुळे, अविनाश पाठक यांनी आष्टी, वडवणी, अंबाजोगाई, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील 413 ग्रामपंचायत सदस्य आणि 13 सरपंचाचे सदस्य रद्द केले आहे.
Avinash Pathak taking big decision
मागील काही दिवसांपूर्वी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील शंभर शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यात वाल्मिक कराड याच्या शस्त्र परवान्याचा देखील समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या :