Pankaja Munde । मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याच जिल्ह्याचं पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सोपवले आहे. यावरून मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी बीडची कन्या आहे. मला बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता. त्याशिवाय बीडकरांना देखील खूप आनंद झाला असता. कोणत्याही संविधानिक पदावर नसताना मागची पाच वर्ष पूर्णवेळ संघटनेसाठी काम केले आहे,” असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “माझा पाच वर्षांचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील विकसनशील कार्यकाळ राहिला असून ते कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. जो निर्णय झाला आहे, त्यावर कोणतीही असहमती न दर्शवता, जे आपल्याला मिळालं आहे, त्यात जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे,” असेही त्या म्हणाल्या आहेत.
Pankaja Munde statement on Beed Guardianship
यावर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “बीडमधील बदललेली स्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्याची विनंती केली होती,” अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :