🕒 1 min read
Jitendra Awhad । बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी अक्षय शिंदे (Akshay Shinde) चा एन्काऊंटर करण्यात आला होता. मुंबई हायकोर्टाकडून याप्रकरणी पाच पोलिसांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.
“अक्षय शिंदे आणि सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) या दोघांच्याही हत्याच! हे दोघेही जात, वर्ण व्यवस्थेचे बळी आहेत, हे आता अमान्य करून चालणार नाही. महाराष्ट्र मनुवादाने पोखरला गेलाय, अजून किती पुरावे हवेत?,” असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत केला आहे.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दोषी ठरवताच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.
Jitendra Awhad on Akshay Shinde, Somnath Suryavanshi murder case
तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “अक्षयचा एन्काऊंटर झाला त्यावेळी म्हटलं होतं की, हा एन्काऊंटर फेक आहे. ही हत्या आहे. सत्य बाहेर आल्याबद्दल मी कोर्टाचे आभार मानते,” अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “… तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा,” बड्या नेत्याचा Dhananjay Munde यांच्यावर निशाणा
- धक्कादायक! आधी चिकनवर ताव अन् मग शिजला Santosh Deshmukh यांच्या हत्येचा कट
- Lucknow Super Giants चा मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूवर सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










