Lucknow Super Giants । लखनौ सुपर जायंट्स संघाने (LSG) आगामी इंडियन प्रीमिअर लीगसाठी (IPL 2025) कर्णधारपदाची घोषणा केली नव्हती. त्यामुळे संघाचे मालक संजीव गोएंका (Sanjeev Goenka) कोणावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अशातच संघाने नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. (LSG new captain) आयपीएलच्या आगामी पर्वासाठी लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) कर्णधारपद सोपवले आहे. ऋषभ पंतबाबत सांगायचे झाले तर संघाने त्याला आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त बोली लावून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
दरम्यान, 21 मार्चपासून आयपीएल 2025 चा थरार सुरु होणार आहे. त्यामुळे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ हळूहळू आपल्या कर्णधारांची नावे जाहीर करत आहेत. पंजाब किंग्जने काही दिवसांपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवले आहे.
Lucknow Super Giants new captain
अशातच आता लखनऊ सुपर जायंट्सनेही आपला कर्णधार जाहीर केला आहे. यंदा आपल्याला सर्वच संघात नवीन खेळाडू पाहायला मिळतील. यंदाचे विजेतेपद कोणता संघ जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :