Sanjay Raut । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सतत राज्य सरकारवर जहरी टीका करत असतात. यामुळे अनेकदा राजकीय वाद देखील झाले आहेत. अशातच आता त्यांनी राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बाजूला करून एक नवीन ‘उदय’ समोर येईल. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत (Uday Samant) यांच्यासोबत 20 आमदार आहेत. जेव्हा 20 आमदार हे एकनाथ शिंदे सरकार स्थापन करताना रुसले होते त्यावेळी हा ‘उदय’ होणार होता,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, ज्यावेळी हा ‘उदय’ करण्याचं निश्चित झालं होतं त्यावेळी एकनाथ शिंदे सावध झाले. हे महाराष्ट्रातील सगळे पक्ष फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आणि राजकारण असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Sanjay Raut on Uday Samant
दरम्यान, आता संजय राऊत यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री उदय सामंत खरोखरच आता राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ करणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :