🕒 1 min read
Jitendra Awhad । मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्याचे राजकारण संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे चांगलेच तापले आहे. अशातच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना न देता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्यात आले. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी मुख्यमंत्र्यांनी निवड केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे लिहिण्याचे कारण एवढेच की, “पुण्याचे पालकमंत्री असताना एक मककोचा आरोपी काही जणांच्या आग्रहाखातर आपण प्रयत्नपूर्वक सोडवला होता,” असे वक्तव्य आपणच एका जाहीर सभेत मनमोकळेपणे केले होते. असा प्रयत्न बीडमध्ये जाऊन करू नका, अशीच आपणाला विनम्र विनंती आणि हात जोडून प्रार्थना. कायद्याचे राज्य स्थापित कराल, ही जी शपथ घेतली आहे, त्या शपथेची फक्त आठवण करून देतोय,” अशी खोचक टीका आव्हाड यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत केली आहे.
आधीच बीड जिल्ह्याचे राजकारण तापले असताना जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवरून अजित पवार त्यांना काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यावरून पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा संघर्ष निर्माण होऊ शकतो.
Jitendra Awhad vs Ajit Pawar
दरम्यान, “बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती,” अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- काय सांगता! दातांमुळे देखील होऊ शकतो Cancer? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
- Mahayuti Government । पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये नाराजी? ‘या’ जिल्ह्यांबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
- Walmik Karad चा आणखी एक कारनामा उघड! बार्शीत दुसऱ्या पत्नीच्या नावावर तब्बल 36 एकर जमीन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now