Mahayuti Government । शनिवारी रात्री महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाची यादी (Guardian Minister List) जाहीर केली होती. पण आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याचे सांगतिले जात आहे.
पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) नाराज झाले असल्याने आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून परिपत्रक काढून रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे.
शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) तर रायगड जिल्ह्याची जबाबदारी मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना दिली होती. पण आता दोन्ही जिल्ह्याची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत सरकारने स्थगित करण्यात आली आहे.
Nashik and Raigad Guardian Minister Post hold
त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :