Share

Icc Champions Trophy साठी भारतीय संघाची घोषणा! कुणाला मिळाली संधी? पहा लिस्ट

by MHD
Team india squad for icc champions trophy

Icc Champions Trophy। चॅम्पियन्स ट्रॉफीची संपूर्ण क्रिकेट विश्वाला उत्सुकता लागली आहे. अशातच आता बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचं रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नेतृत्व करणार असून शुबमन गिल (Shubman Gill) हा उपकर्णधार असणार आहे.

असा असेल संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळापत्रक (Champions Trophy 2025 Schedule)

19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची.
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई.
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची.
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर.
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई .
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी.
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी.
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर.
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची.
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई.
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई.
5 मार्च – उपांत्य फेरी 2, लाहोर.
9 मार्च – अंतिम सामना, लाहोर/ दुबई.

Icc Champions Trophy 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गटविभागणी –

अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश.
ब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड.

महत्त्वाच्या बातम्या :

BCCI Selection Committee Chairman Ajit Agarkar has announced the Indian squad for the Icc Champions Trophy.

Sports Cricket Marathi News