Walmik Karad । खंडणीप्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. आज केज जिल्हा व सत्र न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर (Walmik Karad bail hearing) महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती.
परंतु आता वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणी ही सुनावणी होणार होती. त्याला या खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे कराडला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, कराडवर मंगळवारी मकोका लावण्यात आला. यानंतर त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. त्याच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली होती. आताही न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्याचे समर्थक आक्रमक होऊ शकतात.
Walmik Karad bail application hearing adjourned
“संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याला अटक होण्यास उशीर झाला. तोच या प्रकरणात मास्टरमाईंड आहे. शिवाय त्याला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं संरक्षण आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :