Share

Dhananjay Munde यांचा राष्ट्रवादीला झटका? घेतला ‘हा’ मोठा निर्णय

by MHD
Dhananjay Munde absent for ncp shirdi convention

Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या अशी मागणी विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असले तरी अजूनही पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला नाही. अशातच आता त्यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

शिर्डीमध्ये आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन (NCP Shirdi programme) पार पडणार आहे. पण या अधिवेशनाला धनंजय मुंडे हे येणार नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामागचे कारण आता स्पष्ट झाले आहे.

धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीत आराम करणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे त्यांचा राजीनामा मागितला जातोय, याच कारणास्तव ते अधिवेशनाला जाणार नाहीत, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

Dhananjay Munde absent NCP convention

परंतु नाराज असलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

The opposition has started demanding that minister Dhananjay Munde should resign in the Santosh Deshmukh murder case. This has increased Dhananjay Munde’s problems.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now