Dilip Walse Patil । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नसल्याने राज्यभरातून आंदोलने केली जात आहेत. यामुळे राज्याचे रुपडं पालटून गेले आहे. या प्रकरणात एक नाव चांगलेच चर्चेत आले आहे ते म्हणजे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे.
सातत्याने विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी (Dhananjay Munde resignation demand) करत आहेत. यावर आता अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर कोर्टाने निर्णय दिला तर तो दोषी होतो. पण मुंडे यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांच्यावर केवळ आरोप होत आहेत. जर काही सिद्ध झालं तर पुढचा निर्णय घेतला जातो,” असे वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
जरी दिलीप वळसे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी त्यांना या वक्तव्यावरून विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान, आज कोर्टात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, केज कोर्टामध्ये पार पडलेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच त्याने कोर्टात जामीनासाठी अर्ज देखील दाखल केला होता.
Dilip Walse Patil on Dhananjay Munde resignation demand
यावर आज कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. तसेच एसआयटी आज धक्कादायक खुलासे करू शकते. कोर्ट वाल्मिक कराडला जामीन मंजूर करणार की सीआयडीची मागणी मान्य करणार? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- बीड प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार, पोलिसांच्या भूमिकेवर Bajrang Sonawane यांचा संशय
- Santosh Deshmukh हत्याप्रकरणामुळे महायुतीत वाढला तणाव! Sanjay Shirsat स्पष्टच म्हणाले…
- Sanjay Shirsat यांच्या कन्येच्या प्रतापानंतर सिडकोचे गेले अध्यक्षपद; ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने केली होती पोलखोल