🕒 1 min read
Sanjay Shirsat । शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतात. सध्या त्यांच्याकडे सरकारकडून सामाजिक न्याय खाते सोपविण्यात आले आहे. पण मंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांना एक मोठा झटका बसला आहे.
महत्त्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून नागपूरमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ या सूत्राचा अवलंब करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता याचा फटका त्यांच्याच पक्षाला बसला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कारण संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून (CIDCO Chairmanship) हटवले आहे. नियमांनुसार मंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला नव्हता. उलट त्यांनी सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेत निर्णयाचा सपाटा लावला होता. हीच बाब मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिरसाट यांना पदावरून बाजूला करण्याचे निर्देश देखील दिले होते.
त्यात दरम्यान, 8 जानेवारी 2025 रोजी त्यांची कन्या हर्षदा शिरसाट यांनी कोणतेही पद नसताना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पश्चिम मतदार संघातील गोलवाडी, तिसगाव आणि वडगाव परिसरातील सिडको (CIDCO) भागाची संबधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
हाती कोणतेही पद नसताना त्यांनी सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असणाऱ्या विकास कामांचा आढावा घेतल्याने आता त्यांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले जात होती. त्यावेळी संजय शिरसाट यांच्याकडे सिडको अध्यक्षपद होते. याबाबत हर्षदा शिरसाट यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केली होती.
त्यांच्या या पराक्रमाची पोलखोल ‘महाराष्ट्र देशा’ने केली होती. ज्याचे पडसाद आता उमटल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच संजय शिरसाट यांना अनेक टीकेचा सामना करावा लागल्या. ‘चहापेक्षा किटलीच गरम’ यांसारख्या कमेंट्स सोशल मीडियावर आल्या होत्या.
जरी चूक लक्षात आल्यावर हर्षदा यांनी फेसबुकवरील पोस्ट डिलीट केली असली तरी संजय शिरसाट हे पदाचा गैरवापर करतात. तसेच नियमांनुसार मंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. त्यांच्याशिवाय त्यांची मुलगीही सर्रास अधिकाऱ्यांच्या बैठका घेत संबंधित कामांची पाहणी करत होती.
अखेर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील 202 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरून शिरसाट यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाली असल्याने त्यांच्याकडे सोपविलेला सिडको अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आणण्यात येत आहे, असे निर्णयात म्हटले आहे.
Sanjay Shirsat CIDCO chairman post
विरोधकांच्या प्रखर विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे अखेर नियमांच्या उल्लंघनाचे कारण पुढे करत नगरविकास विभागाने संजय शिरसाट यांच्या पदाचा घेतला, अशा चर्चा आता रंगल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Walmik Karad ला पुन्हा मोठा झटका! दुसऱ्या पत्नीच्या नावावरची कोट्यवधींची संपत्ती ED घेणार ताब्यात?
- बीड की गुन्हेगारी विश्व? Santosh Deshmukh यांच्या हत्येनंतर गोळीबाराच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ
- IPL 2025 । केएल राहुल नव्हे, तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार Delhi Capitals च्या कर्णधारपदाची धुरा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










