Santosh Deshmukh । बीड जिल्हा गुन्हेगारीचं केंद्रस्थान बनत चालला आहे, असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. कारण आधी संतोष देशमुख यांची हत्या मग गुरुवारी मध्यरात्री दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. अशातच आता बीडमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Gun fire in Beed)
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील आंबेजोगाई शहरातील टिळक नगर भागात गोळीबार (Gun firing Ambajogai) झाला आहे. जमीन आणि संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाला आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Gun firing at Ambajogai
या वाढत्या घटनांवरून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही हेच स्पष्ट होत आहे. पण सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वाढत्या गुन्हेगारीला पोलीस जरब बसवणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :