Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातत्याने विरोधकांकडून त्यांचा राजीनामा मागितला जात आहे. तरीही धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. अशातच आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
धनंजय मुंडे यांच्यावर आता आता कृषिमंत्री पदावर असताना 2600 रुपयांचा कृषीपंप 3650 रुपयाला खरेदी केला होता, असा आरोप केला जात आहे. (Spray pump Scam) राजेंद्र मात्रे यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. यावर आता न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे.
दरम्यान, कृषी विभागाकडून (Department of Agriculture) 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी सुरु करण्यात आलेल्या डीबीटी योजनेत मुंडे यांनी 23 ऑक्टोबर 2023 मध्ये बदल केला. यावर देखील आता राज्य सरकारला उत्तर द्यावे लागणार आहे.
Spray Pump Scam of Dhananjay Munde
जर सरकारकडे बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी होती तर मग सरकारने गरजेपेक्षा जास्त पैसे मोजत कृषी साहित्य खरेदी केली असा दावा याचिकेमध्ये केला आहे. यावर आता राज्य सरकारला दोन आठवड्यात नागपूर खंडपीठाला उत्तर द्यावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Santosh Deshmukh हत्याकांडानंतर बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांचा निर्घृण खून
- वाल्मिक कराड नाही तर ‘हा’ आहे Santosh Deshmukh यांच्या हत्येमागचा मास्टरमाइंड? CID ने केला खळबळजनक खुलासा
- Cheapest Recharge Plan । 14 महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो हाय-स्पीड डेटा असणारा शानदार रिचार्ज प्लॅन, किंमत आहे…