🕒 1 min read
Santosh Deshmukh । मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यामागचे कारण म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरण. अशातच आता आणखी एका हत्याकांडाने बीड पुन्हा हादरलं आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्ये रॉडने वार करत दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला आहे.
अजय भोसले आणि भरत भोसले असे मृत पावलेल्या भावंडाची नावं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा खून त्यांच्याच नातेवाईकांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय आणि भरत भोसले यांचा त्यांच्याच नातेवाईकासोबत किरकोळ जुना वाद होता.
पण हाच वाद त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला आहे. जुन्या वादातून त्यांची काल रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही दोन्ही भावंडे बीड नगर हद्दी वरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे रहिवासी आहेत. याच गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
Double Murder case in beed
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हत्येनंतर गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तसेच मागील काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारीला पोलिसांचा जरब कधी बसणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- वाल्मिक कराड नाही तर ‘हा’ आहे Santosh Deshmukh यांच्या हत्येमागचा मास्टरमाइंड? CID ने केला खळबळजनक खुलासा
- Cheapest Recharge Plan । 14 महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह येतो हाय-स्पीड डेटा असणारा शानदार रिचार्ज प्लॅन, किंमत आहे…
- IPL 2025 । कोणत्या दोन संघात खेळला जाणार सलामीचा सामना? महत्त्वाची माहिती आली समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












