Walmik Karad । वाल्मिक कराड याच्यावर मकोका (Macoca) कायद्याअंतर्गत कारवाई करताच बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्याचे समर्थक आणि कुटुंबीयांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.
पण सध्या वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड (Manjili Karad) या सध्या सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या आहेत. याला कारण आहे त्यांची प्रतिक्रिया. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अवघ्या 4 तासातच त्यांची जात बदलली आहे. (Walmik Karad Wife)
“पण मी पण मराठ्याचीच आहे. मी पण 96 कुळी मराठाच आहे. आमच्या महाराजांनी असलं शिकवलं नाही. तुम्ही आधी गुन्हे सिद्ध करा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी पहिल्यांदा दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दुसरी प्रतिक्रिया दिली. “या भागामध्ये वंजारी समाजाचे म्हणजे अल्पसंख्यांकांचे दोन मंत्री दिले गेले. हीच बाब मराठा समाजाच्या लोकांना खुपायला लागला,” असा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या मंजिली कराड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकजण त्यांना त्यांची जात विचारत आहेत. अवघ्या 4 तासातच त्यांनी आपल्या जातीचा विसर पडला असल्याच्या टीका त्यांच्यावर केल्या जात आहेत.
Walmik Karad Wife trolls
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा मुख्य सूत्रधार दाखवलं आहे. तसेच कराडला या गँगचा सदस्य दाखवलं आहे. CID च्या खुलास्यानंतर वाल्मिक कराड याला काहीसा दिलासा मिळाला, अशी चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :