Share

Walmik Karad ला पुन्हा मोठा झटका! दुसऱ्या पत्नीच्या नावावरची कोट्यवधींची संपत्ती ED घेणार ताब्यात?

by MHD
Walmik Karad Wife jyoti Jadhav Property in pune

Walmik Karad । वाल्मिक कराड याच्या अडचणी संपता संपत नाहीत. दररोज त्याला नवनवीन धक्के बसत आहेत. नुकतीच त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत (Macoca to Walmik Karad) कारवाई करण्यात आली आहे. याचे तीव्र पडसाद बीडमध्ये उमटल्याचेही आपण पाहिले.

वाल्मिक कराडने पुण्यामध्ये करोडो रुपयांची संपत्ती जमवल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अशातच आता त्याच्या संपत्तीबद्दलची आणखी एक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव (Jyoti Mangal Jadhav) यांच्या नावावर देखील पुण्यात आणखी तीन फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आलीय. (Walmik Karad Wife)

तसेच ज्योती मंगल जाधवला वाल्मिक कराडपासून दोन मुलं आहेत. त्याने त्यांच्या नावावर काही संपत्ती खरेदी केल्याची माहिती आहे. (Walmik Karad Property) हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये सेक्टर आर 21, टॉवर 33, 17 वा मजल्यावर 7 नंबरचा एक फ्लॅट, आर 21, टॉवर 33, 8 नंबरचा दुसरा फ्लॅट आणि Gera Greensville, फ्लॅट नंबर A 3 आणि खराडी येथे फ्लॅट ज्योती जाधव यांच्या नावावर आहे.

महत्त्वाचे म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्योती जाधव यांची चौकशी केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या पत्नीच्या नावावरची कोट्यवधींची संपत्ती ED ताब्यात घेणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरते.

Walmik Karad Wife Jyoti Jadhav Property

महत्त्वाची बाब म्हणजे भाजप आमदार सुरेश धस हे सातत्याने वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करत असतात. नुकताच त्यांनी वाल्मिक कराड यांच्या पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावावर जास्त संपत्ती असल्याचा आरोप केला होता. यावरून देखील मोठी खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Shocking information came to light that Walmik Karad had accumulated wealth worth crores of rupees in Pune. In this way, another information about his wealth has come to light.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now