Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणामुळे महायुतीत वाढला तणाव! Sanjay Shirsat स्पष्टच म्हणाले…

by MHD
Sanjay Shirsat on Santosh Deshmukh murder case walmik karad

Sanjay Shirsat । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आंदोलने केली जात आहेत. यावरून राज्य सरकारला देखील चांगलेच धारेवर धरले जात आहे. तसेच महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारला टार्गेट करून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापल्याचेही आपल्याला पाहायला मिळत आहे. यावरून आता महायुतीत तणाव वाढला असल्याचे बोलले जात आहे.

अशातच आता मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. “बीड प्रकरणामुळे महायुतीत तणाव वाढत आहे. मंत्री धनंजय मुंडेंबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठरवावं. तसेच भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याबोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठरवावं, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे.

Sanjay Shirsat on Santosh Deshmukh case

दरम्यान, नुकतेच संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे. नियमांनुसार मंत्रीपद स्वीकारल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. तरीही त्यांनी पदाचा राजीनामा दिला नव्हता. अखेर नियमांच्या उल्लंघनामुळे नगरविकास विभागाने एका आदेशाद्वारे त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यभार समाप्त करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Minister Sanjay Shirsat has given a reaction on Santosh Deshmukh murder case. There has been a lot of excitement over this.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now