Bajrang Sonawane । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनावणे यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. ते सतत या प्रकरणावरून धक्कादायक खुलासे करत असतात. सध्याही त्यांनी एक असाच खुलासा केला आहे. (Santosh Deshmukh case update)
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपींची संख्या वाढणार असून त्यांनी आता पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या हत्येमध्ये आणखी कोणाचा हात आहे? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID ने आता वाल्मिक कराड (Walmik Karad) नाही तर सुदर्शन घुले याला गँगचा मुख्य सूत्रधार दाखवलं आहे. तसेच कराडला या गँगचा सदस्य दाखवलं आहे. CID च्या खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Bajrang Sonawane on Santosh Deshmukh case
CID च्या खुलास्यामुळे वाल्मिक कराड याला काहीसा दिलासा मिळाला आहे, असे बोलले जात आहे. तरीही त्याची पोलीस कोठडीतून सुटका झाली नाही. त्याच्या सुटकेसाठी त्याचे समर्थक अजूनही आक्रमक भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आपल्या आसपास असे समाजकंटक आहेत, हीच मोठी दुःखाची बाब आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “तहसीलदार आणि ‘त्या’ राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा दाखल करा गुन्हा”; Kirit Somaiya यांची आक्रमक मागणी
- Sanjay Shirsat यांच्या कन्येच्या प्रतापानंतर सिडकोचे गेले अध्यक्षपद; ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने केली होती पोलखोल
- Santosh Deshmukh हत्याप्रकरणामुळे महायुतीत वाढला तणाव! Sanjay Shirsat स्पष्टच म्हणाले…