Kirit Somaiya । भाजपचे नेते किरीट सोमय्या हे विरोधकांना वेगवेगळ्या मुद्द्यावरून चांगलेच घेरतात. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा वाद सुरु असतो. सध्या त्यांच्या एका मागणीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
आता त्यांनी थेट तहसीलदार, राजकीय नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याला कारण आहे ते म्हणजे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना दिलेले जन्म प्रमाणपत्र. (Bangladeshi and Rohingyas) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र (Bangladeshi and Rohingyas birth certificate) देण्यासाठी तहसीलदार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांना काही राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याचाही आरोप केला आहे. “नोव्हेंबर 2023 मध्ये संसदेने ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसल्याने त्यांच्यासाठी एक कायद्यात सुधारणा आणली. या तरतुदीमुळे राज्यात मागील काही महिन्यांत बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतातील जन्म प्रमाणपत्र दिले. त्यासाठी काही राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डरवरील जे एजंट यांनी मदत केली. यानुसार एक लाख बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याबाबत विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज आले आहेत,” असा दावा सोमय्या यांनी केला आहे. (Malegaon Tehsildar)
Kirit Somaiya demand against Malegaon Tehsildar
त्यामुळे मालेगावच्या तहसीलदाराविरोधात आणि त्यांना जे पाठिंबा देणारे राजकीय नेते आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. जन्माचे दाखले मिळवण्यासाठी फसवी कागदपत्रे सादर केल्याबद्दल त्यांनी बांगलादेशी रोहिंग्यांविरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असल्याचीही पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sanjay Shirsat यांच्या कन्येच्या प्रतापानंतर सिडकोचे गेले अध्यक्षपद; ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने केली होती पोलखोल
- Santosh Deshmukh हत्याप्रकरणामुळे महायुतीत वाढला तणाव! Sanjay Shirsat स्पष्टच म्हणाले…
- Walmik Karad ला पुन्हा मोठा झटका! दुसऱ्या पत्नीच्या नावावरची कोट्यवधींची संपत्ती ED घेणार ताब्यात?