Share

“नील, तू काय उद्धव काकांना डोळा मारला?”; सोमय्यांच्या ‘त्या’ प्रश्नाने मविआचा जळफळाट!

Kirit Somaiya mocks Uddhav Thackeray after his son Neil Somaiya’s victory becomes certain in Ward 107 due to the rejection of the NCP candidate’s nomination.

Published On: 

Kirit Somaiya mocks Uddhav Thackeray after his son Neil Somaiya's victory becomes certain in Ward 107 due to the rejection of the NCP candidate's nomination.

मुंबई – राजकारणात शत्रूचा पराभव करण्यासाठी डावपेच आखले जातात, पण शत्रूनेच मैदानातून माघार घेतली तर? मुंबईत भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या मुलाबाबत असंच काहीसं घडलंय. मुलुंडमधील वॉर्ड क्रमांक १०७ मधून नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा विजयाचा मार्ग आता जवळपास मोकळा झालाय, कारण विरोधात कुणीच उरलं नाहीये. या विजयाच्या आनंदापेक्षा सध्या चर्चा आहे ती किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावलेल्या एका खोचक टोमण्याची!

Kirit Somaiya taunts Uddhav Thackeray

किरीट सोमय्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच नीलला विचारलेला प्रश्न सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. “नील, तू काय उद्धव काकांना डोळा मारला होता का?” असा सवाल करत सोमय्यांनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. इतकंच नाही तर, “विरोधातला एकही उमेदवार इथे टिकला नाही. १६ तारखेला निकालाच्या दिवशी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष संपलेले असतील,” असा मोठा दावा देखील सोमय्यांनी केला आहे.

वॉर्ड क्रमांक १०७ ही जागा ठाकरे बंधूंनी (उद्धव आणि राज ठाकरे) शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सोडली होती. राष्ट्रवादीने इथून हंसराज दानानी यांना उमेदवारी दिली. पण ऐनवेळी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र न जोडल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा अर्जच बाद ठरवला. त्यामुळे रिंगणात आता मुख्य विरोधी पक्षच उरला नाही. ठाकरे बंधूंनी उमेदवार दिला नाही आणि पवारांचा गडी बाद झाला, त्यामुळे नील सोमय्यांचं नशीब फळफळलं!

मुलुंड विधानसभेत एकूण ६ वॉर्ड आहेत. त्यापैकी फक्त १०७ क्रमांकाच्या वॉर्डात विरोधकांची पाटी कोरी राहिली आहे. २०१७ मध्येही नील सोमय्या इथून निवडून आले होते. सोमय्यांच्या या ‘डोळा मारण्याच्या’ विधानावर आता मातोश्रीवरून काय प्रत्युत्तर येतं, हे पाहणं रंजक ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही